बंद मध्ये सर्व धर्मीयांचा सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती 3 मार्च रोजी हत्येचे फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत होताच महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे त्याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात देखील उमटले आहे बुलढाण्यातल्या दुसरबीड येथे दुसर बीड बंदची हाक देण्यात आली होती या बंद मध्ये सर्व व्यापारी संघटना सर्वपक्षीय नेते तसेच गावकरी मंडळी यांनी सहभाग घेतला निषेध सभेमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी डॉ. डी एस शिंदे, व्यापारी युनियनचे प्रभाकर ताठे, निवृत्ती वायाळ, टी एन मोगल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इरफान अली शेख, माजी सभापती विलासराव देशमुख, शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) जुनेद अली शेख, डॉ. शिवाजीराव खरात, आदींनी सभेला संबोधित केले
यावेळी उत्तमराव देशमुख, दिलीप देशमुख, प्राध्यापक सुधीर निकम बाळासाहेब भोसले, प्रवीण देशमुख शहजाद खान पठाण, राजेश्वर देशमुख, अशोक सवडे, सतीश खेडेकर, महेश भांबर्गे, प्रदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गजानन जगताप ,जावेद शेख, अमोल भोसले, ज्ञानेश्वर देशमुख, जाकीर भाई शेख, सोसायटी अध्यक्ष शब्बीर भाई शेख, आत्माराम खंदारे, राजेश कायस्थ, अजय जैन, गुणवंत देशमुख, प्रदीप कुमार तातेड, शिवाजी कानडे, हरिभाऊ महाडिक, राम देशमुख, श्री देशमुख, अभिजीत बाळासाहेब देशमुख, सतीश पिसे, कैलास टिपाले संजय तिपाले, आदी उपस्थित होते
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा