maharashtra day, workers day, shivshahi news,

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा - उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पिक कर्ज पिक विमा व इतर सरकारी योजना मिळवण्यासाठी होणार उपयोग 

Farmer ID, sachin ithape, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी (ॲग्री स्टॅक) बनवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) मधून कृषी व महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शिपणे व कुठल्याही अडचणी शिवाय दिल्या जाणार असल्याने सर्वांनी फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन  उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. 

शंभर दिवसांच्या कृती आरखड्यातंर्गत उपविभागीय अधिकारी श्री. इथापे  यांची आज मौजे सावळेश्वर (ता.मोहोळ) येथे क्षेत्रभेट दिली. यावेळी सहायक महसूल अधिकारी चंद्रकांत ढवळे तसेच सावळेश्वर मंडळातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तसेच पोलीस पाटील  उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्री इथापे म्हणाले शासनाच्या मिळणाऱ्या सर्व योजना या शेतकरी प्रमाणपत्रावर आधारित असून शेतीचा सर्व माहितीचा संच ॲग्री स्टॅग मधून शासनाला प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभा हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. मौजे सावळेश्वर येथील फार्मर आयडी (ॲग्री स्टॅक) नोंदणीचे प्रमाण फक्त 38 टक्के असून हे प्रमाण खूप कमी असून शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी  काढावेत. 

तसेच गावातील गरीब व गरजू लोकांना धान्य मिळत नाही त्या त्यांनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत व गावातील जे लोक सध्या प्राधान्य कुटुंबामध्ये समावेश आहेत परंतु त्याची आर्थिक स्थिती चांगली असल्यास त्यांनी स्वतःहून अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सोडावा जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना साठी पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. यावेळी रोजगार हमी योजनेद्वारे चालू असणारे महात्मा गांधी सिंचन विहीर व गाई गुरांचा गोठा फळबाग लागवड योजना व शेत तळे कंपोस्ट खत तयार करणे या योजनाची माहिती दिली. रोजगार हमी योजनेतून सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. घरकुल प्रकरण मंजूर असणारे परंतु घरकुल बांधण्यासाठी जमीन नसणाऱ्या मागासवर्गीयनागरिकांना शासनातर्फे दिनदयाळ उपाध्याय योजनेद्वारे जमीन खरेदी योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी इथापे यांनी केले. 

यावेळी ग्रामस्तरावरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे शासनाच्या सर्व योजनेमध्ये ग्रामस्थरातील लोकांचा सहभाग वाढवणे व प्रशासन व ग्रामस्थांमध्ये समन्वय राखून सहकार्य करण्याच्या सूचना संबधित  पोलीस पाटील यांना देण्यात आल्या.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !