बिलोली तहसील कार्यालय व पंचायत समितीचा भोंगळ कारभार - शंकर आचेवाड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे गागलेगाव येथील दिव्यांग महिला सौ. शोभा तुकाराम जाधव रा. गागलेगाव येथील दिव्यांग महिलांच्या नावे घरकुल रजिस्ट्रेशन नंबर MH1977418 2017-18 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झाले होते. ग्रामपंचायत कार्यालय गागलेगाव चे ग्रामरोजगार सहाय्यक विजय संभाजी कदम व घरकुल इंजिनियर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे सही व कागदपत्रे घेऊन गेले. त्यानंतर घरकुलाची पुढील प्रोसेस मला सांगितले नाही.
मी घरकुला संदर्भात चौकशी केली असता ऑनलाइन सौ. प्रतीक्षा विजय कदम यांचे नाव खाते क्रमांक एस बी आय 3126 वर पैसे गेल्याचे दाखवत आहे असे म्हणणे दिव्यांग बांधवाचे आहे. वरील प्रकरणाची चौकशी करून दिव्यांग महिलाची फसवणूक करून शासनाची दिशाभूल करत फसवणूक केलेल्या संबंधित दोषींना व रोजगार सेवकांची पुढील तीन दिवसांमध्ये चौकशी करून फौजदारी कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे दिव्यांग बांधवांनी या वेळी बोलताना व्यक्त केली आहे.आणि दिव्यांग महिलांना न्याय द्यावा असे बिलोली तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शंकर भाऊ आचेवाड यांच्या नेतृत्वाखाली कुलूप बंद आंदोलन मोठ्या प्रमाणात पंचायत समिती बिलोली ला घेराव घालण्यात आला होता बिलोली तालुक्यातील व नायगाव तालुक्यातील दिव्यांग बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा