बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठपुराव्याला यश
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर मधील काचे आळी येथील आपला दवाखाना मध्ये आता गरिब रूग्णांनसाठी खाजगी मेडिसीन मोफत मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाने गाजावाजा करून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही सेवा शहरातील कामगार, कष्टकरी गरजू लोकांची गरज ओळखून दुपारी २ ते रात्री १० वाजे पर्यंत चालू केली.
शिरूर नगरपरिषद हद्दी मध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून काचे आळी येथे आपला दवाखाना सुरू केला.दवाखाना सुरू झाल्या पासून तेथे औषधांची कमतरता तसेच सतत डॉक्टर गैरहजर असलेल्या रूग्णांच्या कम्प्लेंट व तसा बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी यांना आलेला अनुभव या मुळे याची रितसर तक्रार शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना केल्या नंतर गटविकास अधिकारी मा.डोके साहेब यांनी याची तात्काळ दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी कुंभार साहेब यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या तक्रारीची दखल घेऊन आपला दवाखाना मध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम चालू केले.
बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी हे सतत आरोग्य विभागाच्या मागे लागल्या मुळे आज सहा महिन्यांच्या प्रयत्ना नंतर शिरूर नगरपरिषद हद्दी मधील काचे आळीतील आपला दवाखान्यात गरिब रूग्णांनसाठी खाजगी औषधांचा साठा उपलब्ध झाला आहे. तसेच आपला दवाखाना येथे MBBS दर्जाचे अनुभवी डॉक्टर संकेत दिघोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर दवाखान्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव सागरदादा घोलप, शिरूर शहर संघटक अशोकभाऊ गुळादे यांनी या कामी शेवट पर्यंत पाठपुरावा करत राहिले.या कामी पत्रकार फैजल भाई पठाण,पत्रकार रविंद्रजी खुडे, पत्रकार शकील मनियार, पत्रकार शुभम वाघचौरे, पत्रकार फिरोज शिकलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या दवाखाना येथे आजपासून सदर खाजगी औषधे मोफत उपलब्ध होतील याचा गरिब गरजुवंत रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टी तर्फे करण्यात आले.
सदर औषधांचा पुरवठा आपला दवाखाना येथे उपलब्ध होण्यासाठी, नव्याने या दवाखान्यात रूजू झालेले डॉक्टर संकेत दिघोळे यांनी तात्काळ प्रयत्न केल्यामुळे हे शक्य झाले.
डॉक्टरांच्या या कार्यतत्परते बद्दल रिध्दी महिला बचत गटाच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा किर्तीताई गुळादे,शितलताई पारसे तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे सागरदादा घोलप, अशोकभाऊ गुळादे व जवान गव्हाणे यांनी डॉक्टर संकेत दिघोळे यांचे छोटासा सत्कार करून आभार मानले.तसेच शिरूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मा.डोके साहेब व कुंभार साहेब यांचे बहुजन मुक्ती पार्टी तर्फे जाहिर आभार.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा