ओझर्डे गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे येथील वाई पंचायत समितीचे माजी सदस्य रामचंद्र विठ्ठल फरांदे (दादा) यांचे दुपारी हृदयविकारच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
२०१२ ते २०१७ पर्यत ते ओझर्डे समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक नितीन फरांदे यांचे ते बंधू होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा