राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांनी केले अभिनंदन
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी पत्रकार संपादक व नागझरी ता.कोरेगाव जि. सातारा गावचे सुपुत्र विकास मुगुटराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून विकास भोसले गेली 22 वर्षे पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
विकास भोसले यांची आत्तापर्यंत 20 दिवाळी अंक व 8 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जय महाराष्ट्र, झी 24 तास, आयबीएन लोकमत यासारख्या वृत्तवाहिन्यांमध्ये सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यानी चिपळूण, घुमान (पंजाब), लातूर, उदगीर, नाशिक व नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये समाजाभिमुख वृत्त निवेदन केले आहे. विकास भोसले यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने त्यांची कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. या निवडीबद्दल परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा