जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा, खंडाळा येथे स्नेहसंमेलन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
खंडाळा पी. एम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे शैक्षणिक वर्ष 2024 -25 चे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या परस्पर सहकार्याचा अनोखा संगम पाहता आला. अति भव्य रंगमंच, दर्जेदार लाईट आणि ध्वनी क्षेपक उत्तम बैठक व्यवस्था या सुविधांच्या साह्याने जवळपास साडेचार तास रंगलेला हा विविध गुणदर्शनाचा सोहळा खंडाळकरांच्या कौतुकाचा विषय ठरला. या कार्यक्रमात 35 गाण्यांचे दर्जेदार सादरीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम पाहत असताना दूरदर्शनवर एखादा लाईव्ह प्रोग्राम पाहत आहोत याची अनुभूती मिळाली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काही सेलिब्रिटींना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये सुरज चव्हाण ची मिमिक्री करणारा संकेत जाधव, प्रति एकनाथ शिंदे म्हणून ओळख असलेले संतोष भोसले, छावा चित्रपटातील विशेष सल्लागार मृण्मय अरबुने यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा उज्वलाताई संकपाळ, उपनगराध्यक्ष सुधीर सोनवणे, माजी नगराध्यक्ष शरद जोशी, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, केंद्रप्रमुख सुनिता साबळे, सेवानिवृत्त अधिकारी सतीश काळभोर, नायब तहसीलदार चेतन मोरे, एसटीआय ऑफिसर संतोष नामदास आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक आश्लेषा गाढवे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष यांनी केले. मुख्याध्यापिका संगीता भोसले यांनी स्वागत केले. चंद्रहास, सुनिता साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. संकेत जाधव याने आपल्या मिमिक्रीचे सादरीकरण केले. प्रति एकनाथ शिंदे ओळख असलेले संतोष भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. शुभांगी गायकवाड, लक्ष्मण पाटोळे, रेखा शेकडे, केशव कोदे यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आश्लेषा गाढवे, पंकज खंडागळे, रत्नकांत भोसले, संदीप गाढवे, सागर गुरव, राहुल ठोंबरे, सागर पवार, संदीप ननावरे, घनश्याम देशमुख, नूतन बहुलेकर, विद्या गौतम, सुवर्णा गाढवे, अश्विनी कदम, रोशन आरा शेख, शुभांगी खंडागळे, मनीषा पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक तसेच पालक वर्गाने परिश्रम घेतले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा