अफजल खान, छत्रपती शिवाजी महाराज भेटीच्या प्रसंगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी महादेव भोसले)
एकीकडे सध्या दहावी बारावी परीक्षा मुळे पालक विद्यार्थी व्यस्त आहेत तर दुसरीकडे पहिली ते चौथी मुलांचे स्नेह संमेलन सुरू आहेत त्यामुळं पालकांची तारेवरची कसरत सुरू आहे.अशातच खर्डी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी रात्री पार पडले.तब्बल चार- साडेचार तास चाललेल्या या कलाप्रदर्शन कार्यक्रमात एका पेक्षा एक सरस गाण्यांनी पालक,दर्शक मुग्ध झाले.देवा श्री गणेशा,घोडे जैसी चाल,झिंगाट,लावण्या,झापुक झुपुक,ललाटी भंडार, पोवाडा,देशभक्ती गीतांबरोबरच एक इंग्रजी नाटकही पार पडले.याचवेळी अफजल खान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या "प्रतापगड भेटीच्या" पोवाड्याने तर अंगावर थरारक रोमांच निर्माण केले.सर्वच गाण्यांना वेगवेगळे पेहराव,साथीला रिहान साउंड सर्व्हिस या नामवंत डी.जे.ची आकर्षक रोषणाईने कार्यक्रमाला शोभा आली.पंचवीस गीते पूर्ण होईपर्यंत चार तास दर्शकांनी जागा देखील सोडली नाही.अनेक वर्षांनी गावात झालेल्या मोठ्या थेट कार्यक्रमामुळे खेड्यातील पोरांनी "आम्ही पण कमी नाही"या दिमाखात नृत्ये करून रसिकांची मने जिंकली.
उद्धाटन प्रसंगी प्रणव परिचारक यांनी सपत्नीक उपस्थिती लावली."लवकरच शाळेच्या जागेचा प्रश्न मिटवून इमारत उभी करू" असे आश्वासन दिले.तर सूरज बब्रुवान रोंगे यांनी मुलांना आपल्याला देश घडवायचा आहे यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी करा असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख श्री कल्याण कुंभार, मुख्याध्यापक म.म.जगदाळे,भाग्यश्री अवधूत,दादा खांडेकर,बालाजी शिंदे,महादेव पवार, अशोक क्षीरसागर आदीसह शिक्षक-पालक संघ अध्यक्ष गणपत रोंगे व सदस्य उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे नेपथ्य व नृत्य मार्गदर्शन रवी माळी यांनी केले तर रंगतदार सूत्रसंचालन श्री अमोल कुलकर्णी व दादा खांडेकर यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा