maharashtra day, workers day, shivshahi news,

वाईत मोहडेकरवाडीच्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाल्याने खळबळ

वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल

No confidence motion against Sarpanch, mohadekarwadi, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्याच्या पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या मोहडेकरवाडीचे विद्यमान सरपंच अनिल एकनाथ ठोंबरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी एकत्रीत येवुन दि .२८ फेब्रुवार रोजी वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केल्याने वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की मोहडेकरवाडीच्या ग्रामपंचायतीची स्थापना १९६७ साली झाली आहे.या गावची लोकसंख्या अंदाजे दिड हजाराच्या आसपास आहे.या ठिकाणी ३ वार्ड आहेत तर ग्रामपंचायत सदस्य संख्या ७ असुन याची पंचवार्षिक निवडणूक होऊन चार वर्ष पुर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे .असे असताना गेल्या दिड वर्षा पासुन येथील ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच म्हणुन अनिल एकनाथ ठोंबरे तर उपसरपंच म्हणुन सिमा संजय बांदल हे गावचा कारभार चालवत आहेत .

पण सरपंच हे  उपसरपंच सिमा संजय बांदल सदस्य पंकज भिमराव शिंदे धनशिंग जयसिंग बांदल प्रियांका प्रशांत महामुनी गुणवंता सुरेश वळकुंदे या पाच सदस्यांना ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असताना सरकार दरबारातुन विविध  योजना गावात राबविण्या साठी आलेला निधी कुठल्या कुठल्या वार्ड मध्ये कसा आलेला निधी खर्च करायचा या बाबत वरील पाच सदस्यांना कधीही विचारात न घेता सरपंच हे हुकुमशाही पध्दतीने मनमानी कारभार करतात त्यांच्यात सुधारणा व्हावी या भावने पोटी यांच्या तक्रारी पक्ष पातळीवरील जबाबदार पदाधिकारी यांच्या समोर अनेकदा मांडण्यात आल्या.

या जबाबदार पक्ष प्रमुखांनी सरपंच अनिल ठोंबरे यांना स्वताच्या मनमानी अट्टाहासाच्या स्वभावात बदल करून गावचा कारभार सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन करण्याचा सल्ला दिला.पण सरपंच यांनी या जबाबदार पदाधिकारी यांनी दिलेल्या सल्ल्याही केराची टोपली दाखविल्याने वरिल पाचही सदस्यांन मध्ये संतापाची लाट उसळली. 

अखेर संतापलेल्या या पाचही सदस्यांनी  एकत्रीत येवुन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी बैठक घेऊन  ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला मनमानी कारभार हा मुळासकट उपटुन टाकण्या साठी व कायमची अद्दल घडविण्यासाठी अविश्वास ठराव दाखल करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्या पध्दतीचे पत्र तयार करुन सरपंच अनिल ठोंबरे यांची सरपंच पदावरून हाकालपट्टी तातडीने करावी या बाजुने वरील पाच सदस्यांनी सह्या करून ते पत्र वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपूर्द केले आहे. 

या दाखल झालेल्या अविश्वास ठरावाची गंभीर दखल वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी घेवुन त्याची खातरजमा करण्यासाठी अविश्वास ठरावावर त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा तातडीची बैठक गुरुवार दि .६ मार्च रोजी  मोहडेकरवाडी ग्रामपंचायत मध्ये दुपारी ४ वाजता  घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्राद्वारे  सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांना  कळविण्यात आले आहे

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !