मंगळवेढा खून प्रकरणातील आरोपी अवघ्या बारा तासात जेरबंद
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
किरकोळ वादातूनही हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर, दोस्तीत कुस्ती होऊन मित्रा-मित्रांची पैशाच्या कारणावरून भांडणेही एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे.
मंगळवेढा तालुक्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 12 तासात अटक केली आहे. महेश उदयकुमार गोवर्धन असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले (रा.बोराळे ता.मंगळवेढा) यास पोलिसांनी अटळ केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले याने मध्यस्थी राहुन यातील मयत महेश उदयकुमार गोवर्धन यास बटईने घेतलेल्या तामदर्डी येथील शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनचे साहित्य घेवुन दिले होते. त्याचे पैसे यातील मयत महेश गोवर्धन याचेकडुन येणेबाकी होते.
यातील आरोपी पैशाची फोनवरुन मागणी करत होता. त्यावेळी त्यांचेत फोनवर वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरुन यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू चौगुले याने दि.23 मार्च रोजी 9.30 च्या सुमारास बोराळे ता. मंगळवेढा येथील छत्रपती चौक येथे मयत महेश गोवर्धन याचे छातीत चाकु सारख्या हत्याराने वार करुन, त्यास गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले आहे.
यातील आरोपीत हा गुन्हा घडलेपासुन फरार होता. त्याचा गोपनीय बातमीदारांमार्फत शोध घेवुन त्यास मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक दत्ताञय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातुरकर, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई विजय पिसे, पोहेकॉ 909 खंडागळे, पोहेकॉ 1810 वाघमोडे, पोहेकॉ 1621 पवार, पोहेकॉ 1603 कांबळे, पोहेकॉ 755 गेजगे, पोना 202 दुधाळ, पोकॉ 1218 देशमुख यांनी 12 तासाचे आत ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अंकुश वाघमोडे हे करत आहेत.
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार सदरची कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी सो, मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो, सोलापूर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड सो, मंगळवेढा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली, मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक श्री. दत्ताञय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातुरकर, सपोनि श्री. अंकुश वाघमोडे, पोसई श्री. विजय पिसे, पोहेका 909 खंडागळे, पोहेकॉ 1810 वाघमोडे, पोहेकॉ 1621 पवार, पोहेकॉ 1603 कांबळे, पोहेकॉ 755 गेजगे, पोना 202 दुधाळ, पोकों 1218 देशमुख यांचे पथकाने केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा