नागरिकांच्या मूलभूत गरजा संदर्भातील विकास कामांना कमी पडणार नाही - परिचारकांचे आश्वासन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना नगरोत्थान अंतर्गत आणि नगरसेवक विवेक परदेशी, समाज सेवक धर्मराज घोडके यांच्या प्रयत्नातून पंढरपूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवार दिनांक २४ मार्च रोजी हाके प्लॉट, गजानन नगर परिसरात हा भूमिपूजन समारंभ पार पडला त्यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी, नगरसेवक विवेक परदेशी, समाजसेवक धर्मराज घोडके, नगरसेवक रेणुका घोडके, गटनेते गुरुदास अभ्यंकर, यांच्यासह हेमंत कुलकर्णी, दादासाहेब रोंगे, भारत माळी असे सोसायटीतील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
परिसरातील लोकवस्ती लक्षात घेता येथे चार लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधण्यात येत असून एक हजार नळ जोडणी धारकांना दहा लाख लिटर पाण्याचे वितरण होणार आहे. यावेळी सचिन कुलकर्णी हेमंत कुलकर्णी भारत माळी यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा व्यक्त केल्या. तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शहराच्या विकासातील कोणत्याही गोष्टीत आपण कमी पडणार नाही. पाणी वीज रस्ते या मूलभूत विकास कामांसाठी कायमच तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले. उपनगरातील वाढती रहिवासी संख्या पाहता आपल्याला पुढील अनेक वर्षांचा विचार करून हे प्रकल्प उभे करावे लागणार आहेत असे देखील त्यांनी सांगितले.
याप्रसंगी इब्राहिम बोहरी, लखन चौगुले, अमोल डोके, राजू सर्वगोड, संजय निंबाळकर, माजी नगरसेविका सुप्रिया डांगे, श्वेता डोंबे, शांताराम कुलकर्णी, डॉ.अश्विनी परदेशी ,छाया हाके, रूपाली निकते, सविता माळी, वैशाली देशपांडे, कंचना शिंदे, ज्योती घोडके, सारिका कोपरे, हेगडे साहेब, मोहन पाटील, राजेंद्र माळी, एडवोकेट साळुंखे, मिलिंद वाघ, सदानंद डिंगरे, रामचंद्र वाघ, मिलिंद येळे, दिपक येळे, महेंद्र हाके, संजय देशपांडे, उत्पात साहेब, संजय रत्नपारखी, रवी येळे, पांडुरंग डोके, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक परिचारक गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा