maharashtra day, workers day, shivshahi news,

ज्ञानसुधा प्राथमिक विद्यालय बाबरा शाळेत १६वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चिमुकल्यांच्या सादरीकरणाने पालक श्रोते मंत्रमुग्ध

dnyansudha Primary School, fulambri, sambhajinnagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)

ज्ञानसुधा शिक्षण प्रसारक मंडळ बाबरा संचलित ज्ञानसुधा प्राथमिक विद्यालयात दिनांक १२ मार्च २०२५ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन शिवव्याख्याते तथा लेखक प्रा.डॉ.संजयजी गायकवाड सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी गाडेकर साहेब होते 

तथा व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती संस्थेचे मार्गदर्शक  मा.श्री शिवाजी अण्णा मैंद, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गणेशजी मैंद, मा.श्रीमती वैशालीताई काळे संचालिका राजमाता सोशल वेलफेअर फाउंडेशन,गावाच्या प्रथम नागरिक सरपंच यमुनाबाई प्रभाकर वाघ, मा.प्रभाकर नाना वाघ,यशस्वी उद्योजक मा.श्री.भारतभाऊ चौधरी,दैनिक सामना चे प्रतिनिधी मा.श्री. रविंद्र भाऊ पिंपळे,सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.नवाबभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते मा.श्री तातेराव भुजंग,  उद्योगपती मा.भगवान शेठ जंगले, नाचनवेल ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.भूषणभाऊ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री विठ्ठल बाबा पाथरे,गावाचे माजी पोलिस पाटील रामकृष्ण पाटील मैंद,ग्रामपंचायत सदस्य डॉ .अंबादासजी काथार, मा.श्रीमती उज्वलाताई महाजन,तथा शाळेचे मुख्याधापक श्री बालाजी रसाळ हे होते,कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण चार्ली चॅप्लिन यांच्या भूमिकेत मा.सोमनाथ स्वभावाने हे होते.

कार्यक्रमांचे उद्घाटन मंचावरील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.या मध्ये नटराज,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विद्येची देवता सरस्वती,भारतमाता प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमातील  प्रमुख अतिथींचे स्वागत इयत्ता ५वी च्या मुलींनी स्वागतगीतांने केले,या वेळी प्रमुख अतिथी,कार्यक्रमाचे उद्घाटक ,कार्यक्रमांचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तथा चार्ली चॅप्लिन यांनी विद्यार्थांचे मनोरंजन करून कार्यक्रमात रंगत आणली.

या प्रसंगी मुख्य कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या  गाण्याने झाली इयत्ता बालवाडी ते सातवीच्या एकूण 18 नृत्य प्रकारांचा अविष्कार विद्यार्थ्यांनी दाखवला त्यात देशभक्तीपर गीत, बालगीत, लावणी, गोंधळ आदिवासी गीत ,छत्रपती संभाजी महाराज, अयोध्या वापस आये राम, मनोरंजनात्मक गीत, होळीगीत,भांगडा,कॉमेडी डान्स,राजनीती गीत,या गीत प्रकारांचे सादरीकरण विद्यार्थांनी केले,यात सर्व विद्यार्थांनी उपस्थितांचे मने जिंकली, ज्ञानसुधा प्रांगण टाळ्याच्या गजराने अगदी दुमदुमले सर्वच पालकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमात एकूण २०० विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अभिषेक ढाकणे व भरत अवघड यांनी तर आभार रामेश्वर चोंधे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा क्षीरसागर,यशवंत साबळे,वैष्णवी वाघ,मेघा गोसावी यांनी परिश्रम घेतले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !