शंभर पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
प्राथमिक आरोग्य केंद्र मालतपूर ता. वाई व अल्को लाईट कॅन्सर हॉस्पिटल सातारा यांचे संयुक्त विद्यमाने खावली उपकेंद्रात गुरुवार दि. 13 रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये स्त्री आरोग्य तपासणी महिलांचे स्तन कॅन्सर तोंडाचा कॅन्सर हृदयरोग चिकित्स्या हाडांचा ठिसूळपणा लहान मुलांची तपासणी मधुमेह रक्तदाब व कर्करोग तसेच हृदयरोग इत्यादी आजारांवर तपासण्या करण्यात आल्या डॉ. अर्जुन शिंदे डॉ. मनीषा मगर डॉ. विनय भोईटे डॉ. देवेंद्र यादव उपकेंद्रातील आनंद ओवाळ एस पवार व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक लोकांच्या तपासण्या करण्यात आले.
सध्या धावपळीच्या जीवनात मानवी जीवनाचे आरोग्य कडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांना कर्क रोगाच्या आजार ग्रासले जात आहे कित्येकदा वेळेत तपासण्या व औषधोपचार न केल्यामुळे मृत्यूचा सामना करावा लागत आहे यासाठी प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची वेळत तपासणी होणे गरजेचे आहे परंतु दुर्गम भाग असलेले जांभळी वासोळे वाशीवली तुपेवाडी रेनावळे वडवली खावली अशा दुर्गम पश्चिम भागातील महिलांना घरच्या आर्थिक अडचणीमुळे इच्छा असूनही परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागून कुटुंब उघड्यावर पडत आहे या उदात भावनेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालतपूर अंतर्गत येणाऱ्या 38 गावातील शंभरहून अधिक महिला पुरुष यांच्या मोफत तपासण्या करून औषधोपचार देऊन आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विनय भोईटे यांनी शिवशाही न्यूजला सांगितले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा