ऋषिकेश तरटे याची सातारा जिल्हा कबड्डी वरिष्ठ पुरुष गटात निवड
सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व भूईंजचे उपसरपंच शुभम पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भूईंज येथे सातारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा झाली या स्पर्धेत निवड समितीतील सदस्य अविनाश ढमाळ, महेश निकम, उत्कर्ष ढोणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पुरुष कबड्डी संघाची निवड करण्यात आली. यामध्ये भुईंज मधील भुगूऋषी क्रीडा मंडळाचा खेळाडू ऋषिकेश तरटे याची सातारा जिल्हा कबड्डी वरिष्ठ पुरुष गटात निवड करण्यात आली.
त्याला नितीन जाधव, किरण जाधव, संजय जाधव, चंद्रकांत निकम, बंटी भोसले, उमेश भोसले, शुभम पवार, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सातारा जिल्हा पुरुष गट कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून महेश निकम व अविनाश ढमाळ यांची सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन सातारा यांच्याकडून निवड करण्यात आली आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा