भावाचे लग्न जुळण्यासाठी बोलले होते नवस
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या बावधन येथील बगाड यात्रेचा यावर्षी बगाड्या होण्याचा मान अजित बळवंत ननावरे (वय 39) यांना मिळाला आहे. बगाड यात्रा येत्या बुधवार दि.१९ रोजी रंगपचमीला निघणार आहे.
बावधन येथे दरवर्षी फाल्गुन महिन्यात तीन दिवस ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथाची यात्रा भरते. यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक असे कार्यक्रम होतात. यावेळी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पोर्णिमेच्या दिवशीच्या रात्री १२ वाजल्यानंतर बगाडया ठरविण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपारिक पध्दतीने कौल लावत असतात.
यावर्षी एकूण ४४ नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते. यातील १० व्या क्रमांकावर असलेल्या अजित बळवंत ननावरे यांच्या बाजूने देवाने प्रसाद दिला असून त्यांना यंदाचा बगड्या होण्याचा मान मिळाला आहे. बगाड्या यांनी त्यांचे बंधू सुनिल बळवंत ननावरे यांच्या लग्न जुळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांचे लग्न लवकर व्हावे यासाठी २०१४ साली नाथांच्या चरणी नवस केला होता आणि तो पूर्ण झाला. अजित ननावरे हे पहिल्यांदाच नाथांचा प्रसाद घेण्यासाठी बसले होते, आणि याच वर्षी बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यामुळे संपूर्ण बावधन पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. त्यानंतर काशीनाथाचं चांगभल, असा गजर करत बगाड्याच्या नावाची घोषणा केली आणि बागड्याने मंदिरा भोवती पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. अजित ननावरे हे सध्या होमगार्ड म्हणून सर्व्हिसला आहेत.
माझ्या भावाचे लग्न ठरावे यासाठी मी २०१४ साली नाथांना नवस केला होता आणि तो पूर्ण सुधा झाला त्यामुळे मी यावर्षी पहिल्यांदाच प्रसाद घेण्यासाठी बसलो होतो आणि नाथांनी लगेच मला हा प्रसाद दिला, त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि मी हे बगाड आनंदाने गावापर्यंत आणीन
बगाड्या अजित ननावरे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा