कवितेची भिशी हा मराठी साहित्य विश्वातील पहिलाच प्रयोग
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर, (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील विश्वविक्रमवीर कवी आणि साहित्य वर्तुळ परिवारचे संस्थापक रवि सोनार यांच्या संकल्पनेतून साहित्य वर्तुळ परिवार पंढरपूर यांच्या वतीने मासिक साहित्य भिशी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मराठी साहित्य विश्वातील कवितेची भिशी हा पहिलाच प्रयोग असून, प्रत्येक महिन्याला सर्व साहित्यिक सहकाऱ्यांनी एकत्र येऊन आपले सादरीकरण करायचे आणि एकमेकांच्या साहित्याचा आस्वाद घ्यायचा असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. साहित्य भिशी या उपक्रमाची सुरुवात दिनांक 16 मार्च रोजी येथील रसिक राज दालनात झाली.
पहिल्या साहित्य भिशीच्या अध्यक्षस्थानी शुभांगी दहिवाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून विणा व्होरा मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सुजितकुमार कांबळे, गजानन गायकवाड, रश्मी कौलवार, प्रिया कौलवार, मुरलीधर शेटे, गणेश गायकवाड, दादासाहेब खरात, राजेंद्र भोसले, सचिन कुलकर्णी, रवी सोनार प्रीती केसकर, संतोष चव्हाण, रोहिणी सोले, व शुभांगी दहिवाळ आणि विणा व्होरा, यांनी आपल्या विविध विषयावर कविता सादर केल्या. या कवितांना उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साहित्यिकांना नियमितपणे मंच उपलब्ध करून देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. असे प्रमुख पाहुण्या विणा व्होरा म्हणाल्या तर सर्वांना समान संधी देऊन साहित्याचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम नियमितपणे व्हावा. यातून नवीन साहित्यिक आणि रसिकही तयार होतील याची मला खात्री वाटते अशा शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभांगी दहिवाळ यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कुलकर्णी यांनी केले तर सुजितकुमार कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा