चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास आमदार म्हणून नागरिकांच्याच बाजूने राहणार असल्याचा दिला विश्वास
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनीधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकारने कॅरीडॉर राबविण्याचा विचार पक्का केला आहे. माञ यासाठी पंढरपूर येथील नागरिकांची मते आजमावणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शासन दरबारी नेमकी माझी भूमिका काय असावी.ही दाखविण्याची आल्यास आपण चुकीच्या पद्धतीने काम व कोणावर अन्याय होत असेल तर मी आमदार म्हणून नागरिकांच्या पाठीशीच उभा राहील. असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहे.
पंढरपूर येथिल कॅरीडॉर बाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शासकीय विश्राम येथे गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला पंढरपूर शहर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी नागरिक आणि व्यापारी यांना निमंत्रित केले होते. गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर कॅरीडॉर विषय चर्चेत असून मंदिर परिसरातील बाधित लोकांनी विरोध दर्शवला होता .तर पंढरपुरातील काहीजण कॅरीडॉरचे समर्थन देखील करत आहेत. यावर या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली.
नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आपापली मते या बैठकीत नोंदवली. त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी कॅरीडॉर बाबत प्रशासनाकडून अजून कोणताही आराखडा आलेला नाही. परंतु सभागृहात जर हा विषय चर्चेला आला तर लोकांचे मत काय आहे हे लोकप्रतिनिधी म्हणून मला माहित असावे यासाठी ही बैठक घेतली असून जे इथल्या लोकांचे मत आहे तेच माझे देखील मत आहे. परंतु कॅरीडॉरला विरोध आहे असा याचा अर्थ नाही. तर ते करताना कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे. असे सांगितले आहे. त्याचबरोबर पंढरपूरकरांचा कॅरीडॉरला विरोध आहे असे माध्यमांनी म्हणू नये . केवळ काहीं भागांतील नुकसान होत असल्याने त्या भागाचा योग्य विचार करू.माञ याचा सर्व अर्थ येथील कॅरीडोर प्रकल्पालाच पूर्णतः विरोध असल्याचे बसवू नये.असेही आ.समाधान आवताडे सुचवले आहे.विकासात्मक गोष्टीला विरोध न करण्याचेही आव्हान यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा