शशिकांत पिसाळ , दीपक ननावरे यांच्याकडून अभिनंदन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शशिकांत पिसाळ , दीपक ननावरे यांचे नेतृत्व मानणाऱ्या सौ वंदना कांबळे यांची निवड झाली. विधानसभेच्या निवडणुकीत गावाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे दीपक ननावरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवले होते. त्यामध्ये जगदीश कांबळे यांनीही विधानसभा निवडणुकीत दीपक ननावरे व त्यांच्या सहकारी सदस्यांना बरोबर घेऊन विधानसभेची प्रचार यंत्रणा राबवली होती. त्याचे फलीत आजच्या झालेल्या सरपंच पदी निवड होताना, सौ वंदना कांबळे यांना सूचक म्हणून दीपक ननावरे यांच्या आठ सदस्यांपैकी तुषार पिसाळ यांनी सूचक म्हणून सौ कांबळे यांचा अर्ज दाखल केला.
सरपंच पदासाठी अर्ज निवडणूक अधिकारी भोसले, सर्कल पांचवड व गाव कामगार तलाठी साळुंखे यांचेकडे सुपूर्त केला. निरीक्षक म्हणून नायब तहसीलदार सौ वैशाली जायगुडे घोरपडे यांनी दुपारी दोन वाजता सौ वंदना जगदीश कांबळे यांचा एकमेव अर्ज असल्याने, त्यांना सरपंच म्हणून निवड झाली असे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत १६ सदस्य उपस्थित होते. शशिकांत पिसाळ, दीपक ननावरे सौ अरुणादेवी शशिकांत पिसाळ ,सुनील तात्या कदम, सचिन भोसले, अंकुश कुंभार, सतीश कांबळे, राजेंद्र चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा