वन विभाग कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन वनवा विझवला
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पाचगणी घाटात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून या घाटातून कित्येक प्रवासी वाहतूक व येजा करीत असतात या घाटात आयुर्वेदिक अशी अनेक वनसंपदा वृक्ष असून या वनसंपदाचे संरक्षण वनविभाग करीत आहे.
परंतु मंगळवार दिनांक अकरा रोजी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा वनवा लागला या रस्त्याच्या खालील व वरील बाजूने येणाऱ्या वाऱ्यामुळे आगिने मोठे रौद्ररूप घेतले. यामुळे वाहतूकदारांना धुराने व आगीने वाहन चालवणे कठीण झाले होते या वनव्याची माहिती वन विभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल एस एन हजारे यांना कळताच त्यांनी वनपाल संग्राम मोरे वनरक्षक सुमित्रा चौगुले वंनसेवक संजय चव्हाण असे वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळावर हजर झाले त्यांनी वाई नगरपालिका व पाचगणी नगरपालिका या दोन्ही ठिकाणचे अग्निशामक बंब बोलावून ही आग विझवली यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु आयुर्वेदिक वनसंपदा आगीत जळून गेली आहेत.
वनक्षेत्रपाल एम एस हजारे वनसंपदा जपणे हे वन विभागाचे आहे परंतु एक नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य आहे की वनसंपदा जळत असेल तर आपणही ती विझवणे गरजेचे आहे परतू घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी व नागरिकांनी आग विझवण्यासाठी कोणतीही मदत केली नाही . यंत्रणा वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा