सिंदखेडराजा तालुक्यात व्यक्त होत आहे हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील युवकाचा पुणे येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैभव मधुकर डिघोळे असे मृत युवकाचे नाव आहे. वैभव हा उच्चशिक्षित असून, पुणे येथे एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. ड्युटी संपल्यानंतर वैभव सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घराकडे परत निघाला होता. मात्र, हडपसर पुलाजवळ त्याच्या दुचाकीला भरधाव वेगातील कंटेनरने जबर धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. वैभव डिघोळे याचा अपघाती मृत्यू झाल्याने झोटिंगा येथे हळहळ व्यक्त होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा