maharashtra day, workers day, shivshahi news,

यशवंत पाचंगे पारगाव संघ ठरला शिरूर येथील पी.आर.डी. क्रिकेट चषकाचा विजेता

एक लाख २१ हजाराचे बक्षीस आणि चषक देवून सन्मानित

Dhariwal (PRD) Cup Cricket Tournament, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण) 

शिरूर येथे उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल(पी आर डी) चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत यशवंत पाचंगे संघ पारगाव प्रथम क्रमांक व एक लाख २१ हजाराचा मानकरी ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी मोहन शेळके इकोग्राम शिक्रापूर संघ एक लाख रुपयांचे मानकरी ठरला. विजेत्या संघांना युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या हस्ते रोख पारितोषिक व मानाचा चषक देण्यात आला. दानशूर उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल व काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अध्यक्ष स्व. केशरसिंग खुशालसिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणात उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारिवाल (पीआरडी) चषक डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे व प्रशांत शिंदे यांनी केले. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष होते.

यावेळी माणिकचंद उद्योग समूहाचे प्रसिध्द उद्योगपती आदित्यशेठ धारीवाल , शिरुर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार ,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस संदेश केंजळे, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे, माजी सरपंच पाचुंदकर पाटील,मंत्रालय कार्यसन अधिकारी प्रवीण शिशुपाल, स्पर्धेचे आयोजक माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे , माजी नगरसेवक राजेंद्र ढोबळे , व्यवसायिक श्रीनिवास परदेशी,माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, सुभाष गांधी, डॉक्टर संतोष पोटे, रुस्तुम सय्यद,,लायन्स क्लब शिरुरचे माजी अध्यक्ष राजेंद्र लोळगे, मयूर नहार, अमोल चव्हाण. दादासाहेब गवारी, फिरोज शेख, सनी दळवी,विजय ढोबळे , तेजस माने, ऋतिक ढोबळे आदी उपस्थित होते. शिरूर शहरात पीआरडी चषक स्पर्धा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून, या स्पर्धेच्या नावलौकिक वाढवण्याचे काम शिरूर शहराने केले आहे. रवींद्र ढोबळे हे  धारिवाल कुटुंबाचे हनुमान असल्याची गौरवउदगार युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांनी काढले.

शिरूर शहरात माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी डे नाईट क्रिकेट स्पर्धा भरून शिरूर शहराला एक नवीन खेळाची दिशा दाखवण्याचे काम प्रत्येक वर्षी करत असून, पीआरडी चषक क्रिकेट स्पर्धा ही उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या नावाला साजीशी होत असल्याचे शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगून दरवर्षी स्पर्धा नवीन नवीन रूपात शिरूरकरांना पाहायला मिळत आहे.

स्पर्धेतील विजयी संघ पुढील प्रमाणे 

  • प्रथम क्रमांक: तुकाई टायगर गृप पारगाव ( संघ मालक, यशवंत पाचंगे ) १ लाख २१ हजार रुपये चषक. 
  • द्वितीय क्रमांक: इकोग्राम संघ शिक्रापूर ( संघ मालक, मोहन शेळके) यांचा आला त्यांना एक लाख रुपये चषक.
  • तृतीय क्रमांक: व्ही सी सी संघ , मांडवगण फराटा ( संघ मालक, एजाज बागवान ) यांचा आला . ७५ हजार रूपये रोख व चषक,
  • चौथा क्रमांक: आमदार राहूलदादा कुल प्रतिष्ठान राहू ( संघ मालक, स्वप्ननील गायकवाड ) संघ ५० हजार रुपये व चषक.


स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज किताब क्षितीज दिवेकर पारगाव यास मिळाला असून इलेक्ट्रिक बाइकचा मानकरी ठरला. बेस्ट बॅटसमॅन इकोग्राम रजत मुंडे शिक्रापूर. बेस्ट बॉलर विकास सुरवसे पारगाव, उत्कृष्ट यष्टीरक्षक सुशांत जाधव मंचर, उत्कृष्ट झेल रॉयल रायडर निशांत जाधव, . सलग तीन चौकार  इकोग्राम संघ शिक्रापूरचे स्वराज्य कामठे , सलग तीन षटकार  महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर संदिप कुरुंदळे , सलग तीन बाद रॉयल रायडर संघ शिरुरचे सूरज गवळी, हे सायकलचे मानकरी ठरले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम केलेले दीपक पिळगावकर , स्वप्ननील कपोले , विनायक पाटील , समालोचक प्रदीप ओव्हाळ, सागर ढवळे ,रवींद्र जाधव , फिरोज बागवान, स्कोअर म्हणून आकाश पवार यांनी काम पाहिले. स्वागत शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे, आभार माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, सूत्रसंचालन जयवंत साळुंखे, रावसाहेब चक्रे यांनी केले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !