शेती पंपाच्या लाखो रुपयांच्या विद्युत केबल,मोटर व शेतकऱ्याची हळद लंपास
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओझर्डे परिसरात चोरांनी अक्षरश हैदोस घातला असून शेतीपंपाच्या विद्युत केबल, मोटारी व हळद चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे. चोरांमुळे शेतकऱ्यांना वारंवार लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे तरीही चोर भुईंज पोलिसांच्या हाती लागत नसल्याने ओझर्डे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप होतं असून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ओझर्डे परिसरात कृष्णा नदी पात्रातून सार्वजनिक पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांच्या शेती साठी खाजगी पाणी पुरवठा जलउपसा योजना असून पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापर केला जातो त्यासाठी लाखो रुपये किमतीच्या केबलचा वापर करावा लागतो सर्व शेतकरी कृष्णा नदी पात्राशजारी असल्यामुळे फायदा घेत चोरटे विद्युत केबल , मोटारी व हळद रात्रीच्या वेळी चोरून शेतकऱ्यां चे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान करत आहेत याला नक्की जबाबदार कोण असा संतप्त सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे. ओझर्डे परिसरात अजू बाजू त्या गावांमध्ये हे कायमचे दुखणे शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. यात्रेचा सीजन असल्यामुळे गावागावात शेतकऱ्यांची पळापळ चालू असल्यामुळे भुरटे चोर त्याचाच फायदा घेत आहेत.
विद्युत केबल व मोटारीच्या चोऱ्या कायमचं चालू आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग चोरांच्या त्रासाने हैराण झाला आहे गेली कित्येक वर्षे वारंवार होणाऱ्या चोऱ्यामुळे सातत्याने लाखो रुपयांच शेतकऱ्यांना नुकसान होते आहे त्यातुनही भुईंज पोलिसांनी चोर पकडलेच तर मुद्देमाल हाती लागत नाही व काही दिवसांनी पुन्हा विद्युत केबल व मोटारी चोरी करत असल्याने केबल चोरांना भुईंज पोलिसांची कसलीही भीती राहिलेली नसल्याने चोरटे खाकी वर्दीला कायमच खुले आव्हान देत असताना ओझर्डे परिसरात चोरट्यांनी यापुर्वी चोरलेला मुद्देमाल कुठल्याच शेतकऱ्याला परत मिळाला नाही किंवा पोलिसांनाही परत मिळवता आला नाही याचा विचार करता भुईंज पोलिसांनी विद्युत केबल ,मोटर व हळद चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा
चोरटे वीजपंप, विदयुत केबल, यावर लक्ष्य करत आहेत. हे साहित्य चोरीला गेल्यास शेतकऱ्यांना हात उसनवार पैसे घेऊन शेतीपंप विकत घ्यावा लागतो. वीजपंप चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा