दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदी व इतर 4 लाख किंमतीच्या सोने चांदी वस्तू दान - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाज्याला नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार यांनी कै. दिगंबर तुकाराम अरगुलवार व कै. जनाबाई दिगंबर अरगुलवार या आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे.
नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारा तर्फे मोफत सेवा
सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून, सदर दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदीचा वापर करण्यात आला असून, यासाठी सुमारे 33 लाख 75 हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे. सदरकामी कारागीर म्हणून मे. जव्हेरी ज्वेलर्स, पंढरपूर यांनी सेवा दिली आहे. याशिवाय, त्यांनी 26 ग्रॅम सोने घंटन श्री रूक्मिणी मातेच्या चरणी तसेच 19.9 ग्रॅम सोने नाम व 45 ग्रॅम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले असून, त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे 4 लाख 18 हजार इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा