महिला पालकांना एकत्र येऊन संवाद साधण्याची मिळाली संधी
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये हळदी कुंकू समारंभ आणि महिला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. माधुरी झेंडगे PSI शिरूर पोलीस स्टेशन, डॉ. पूनम दफळ आणि मा. रोहिणी बनकर माज़ी नगर्सेविका यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण व पालकत्व यावर मार्गदर्शनाने झाली. महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका कशी बजवावी याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. तसेच, समुपदेशनाच्या माध्यमातून पालकांच्या शंका व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मेळाव्यात मनोरंजनाचे खास आयोजन करण्यात आले होते. विविध खेळ,संगीत खुर्ची, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थित महिला पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. हळदी कुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमाने वातावरण अधिक उत्साही झाले.
या कार्यक्रमामुळे महिला पालकांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळाली आणि शाळा व पालक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ झाले. शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा