गाळे बांधून सामान्य व्यवसायिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा अशा ७२ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ४३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दोन भागामध्ये हे काम केले जाणार आहे. निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यावर या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यामुळे जलद, सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुक सुविधा शिरवळ, लोणंद, वाठार या परिसराकरता उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोणंद नगरपंचायत हद्दीतील शिरवळ चौक येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम सोमवार दि. १० पासून सुरु होत आहे. या चौकात असणाऱ्या टपरीधारकांना प्रशासनाने आगाऊ सूचना दिल्या आहेत.
टपरीधारकांनीही प्रशासनाच्या सूचनेला मान देत स्वतःहून टपऱ्या काढण्यास सुरवात केली आहे. मात्र अतिक्रमण काढल्यानंतर या सामान्य टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान डॉ. नितीन नितीन सावंत यांनी टपरीधारकांच्या पुनर्वसनाची जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे. याठिकाणी असणारे वखार महामंडळ आणि पोलीस लाईन येथे गाळे बांधून या सामान्य व्यवसायिकांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी यावेळी डॉ.नितीन सावंत यांनी केली.
वखार महामंडळ आणि पोलीस लाईन येथे गाळे बांधल्याने टपरीधारकांचा व्यवसाय अबाधित राहिलं आणि प्रशासनाचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. टपरीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी दिला. यावेळी काही टपरीधारकांनी संतप्त प्रतिक्रिया देत पुनर्वसनाची जोरदार मागणी केली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा