शरद कृषी महोत्सवात चौथ्या दिवशी तरुणाईचा जल्लोष
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शरद कृषी महोत्सव लोणंद महोत्सवांमध्ये आज चौथ्या दिवशी जल्लोष तरुणाईचा युथ फेस्टिवल हे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या हस्ते झाले या कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गेली सहा वर्षे डॉ. नितीन सावंत यांच्या प्रयत्नातून व जिद्दीने व अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते या कृषी महोत्सवात जगातली सर्वात लहान राधा नावाची म्हैस व खटावचे फौजी यांचा एक टन वजनाचा मुरा जातीचा रेडा त्याची लांबी साडेआठ फूट उंची सहा फूट तसेच अनेक प्रकारचे पशुपक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी लोणंद व पंचक्रोशीतील नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली या प्रदर्शनामध्ये अडीचशे स्टॉल असून या स्टॉलमध्ये अनेक प्रकारचे लहान मुलापासून घर वस्तू संसारिक वस्तू व शेतकऱ्यांना लागणारे सर्व अवजारे तसेच सोलर ट्रॅक्टर व खवय्यांसाठी सर्व पदार्थांची रेलचेल पहावयास मिळाली.
महिला बचत गटांनी तयार केलेला निरनिराळ्या वस्तू व खाद्यपदार्थ याचा लाभ सर्वांनी घेतला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे चारही दिवस रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली आज युथ फेस्टिवल निमित्त लोणंद पंचक्रोशीतील 23 शाळांमधील लहान लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला या लहान मुलांचे कौतुक आ. रोहित पवारांनी केलं आणि त्यांचेही लहानपण आठवलं दादांनी आपलं मनोगत व्यक्त करताना लहानपणाचे किस्से ही सांगून टाकले या कार्यक्रमासाठी अभिजीत होवाळ अनिरुद्ध गाढवे राहुल घाडगे बापूराव धायगुडे हर्षवर्धन शेळके पाटील शैलजा खरात सुरेश शेळके स्वप्निल श्रीरसागर मयूर श्रीरसागर शेखर क्षीरसागर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमोहन दास खुडे यांनी केले तर आभार आदर्श पुरस्काराने सन्मानित केलेले रघुनाथ शेळके सर यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा