बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयात होते कार्यरत
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
राष्ट्रीय स्काऊट गाईड कॅम्प तामिळनाडू येथे आयोजित केला होता. त्या कॅम्पमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयाचे शिक्षक पुरुषोत्तम डिगांबर मानतकर हे सहभागी झाले होते. त्यांचा झोपेतच हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा काल, दि. २ फेब्रुवारीरोजी सकाळी ४ वाजता मृत्यू झाला. मृत्युसमयी ते ५७ वर्षांचे होते. सेवानिवृत्ती जवळ आली असताना त्यांना मृत्यूने गाठल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील स्काऊट गाईडचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली ३६ शिक्षक तामिळनाडू राज्यातील त्रिजुरापल्ली जिल्ह्यातील जांभोरी या गावी दि. २६ जानेवारी रोजी गेले होते. जांभोरी येथे भारतातील आणि बाहेरील १२ देशातील स्काऊट गाईड शिक्षक आणि विद्यार्थी यांचा मेळावा दि. १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत आयोजित केला होता. या मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातील स्काऊट गाईडचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली ३६ शिक्षकांची टीम गेली होती. त्यात साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयाचे शिक्षक पुरुषोत्तम डिगांबर मानतकर (वय ५७) हेसुद्धा सहभागी झाले होते. दि. ३१ जानेवारीरोजी तेथे पोचल्यानंतर दि. १ फेब्रुवारी रोजी मेळाव्यात सहभागी झाले.
रात्री हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले असता, रात्री त्यांचा झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही बातमी सकाळी साखरखेर्डा येथे कळताच हळहळ व्यक्त करण्यात आली. पुरुषोत्तम मानतकर यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा