झोपेची डुलकी ठरली मृत्युस कारणीभुत - कारचा भिषण अपघात
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
समृद्धी महामार्गावर दि.3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.00 वा दरम्यान एका भाविकाच्या कारला अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार एका कुटुंब प्रयागराज येथून आपल्या मूळ गावी संभाजीनगर येथे परत जात असताना दुसरबीड जवळ चंनैज नंबर 320.7 मुंबई कैरीडोअर वर चालक अक्षय भगवान नराळे वय 25 वर्ष रा संभाजीनगर याला झोपेची डुलकी लागल्याने सदर कार अनियंत्रित होऊन साईड वैरीअरला धडकली व कार ने महामार्गावर दोन पलट्या मारल्या.
या अपघातामध्ये रूपाली भगवान नराळे वय 45 वर्ष यांना गंभीर मार लागल्याने ह्या जागेवरच मरण पावल्या व भगवान देविदास निराळे वय 55 वर्ष हे गंभीर जखमी चाले तसेच संजय पवार वय 65 वर्ष, मंगला संजय पवार वय 60,हे किरकोळ जखमी झाले. महामार्गावर महामार्ग पोलीस चे सहाय्यक निरीक्षक इंगळे साहेब व त्यांची टीम पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे असे प्रबोधन पर आव्हान करत आहे.
सदर गंभीर जखमी यांना तात्काळ महामार्ग ॲम्बुलन्स 108 चे डॉक्टर उज्वल तायडे व चालक प्रविण राठोड यांनी तात्काळ औषध उपचार करून पुढील उपचारा कामी सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे नेले. तसेच महामार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वनवे, विष्णू गोलांडे, गोपाल गौरले व महामार्ग सुरक्षा बल चे जवान यांच्या मदतीने व QRV टीम यांनी सदर सदर मृत्यक महिला यांना अपघातग्रस्त कारच्या बाहेर काढून अॅम्बुलन्स द्वारे स्वाना केले. व अपघात ग्रस्त कार केनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा