संत चोखासागर जलाशयातून पाणी सोडण्यासाठीआमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा मतदार संघातील खडकपूर्णा नदीपात्रातील पाणी साठा संपला असल्याने बहुतांश गावातील शेतकऱ्यांना पिकाला पाणी व जनावरांच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेता मतदार संघातील आमदार मनोज कायदे यांनी खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून आज ४ फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्याच्या उपस्थित पाणी सोडले.
पाणी सोडण्यासाठी संबंधित सर्वच विभागाचा समन्वय साधते पाठपुरावा केला होता यामुळे नदीकाठच्या सुमारे ४४ गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान वाटल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले सिंदखेडराजा मतदार संघातील डिग्रस, निमगाव बायाळ, दुसरबिड, देवखेड लींगा येथील कोल्हापूरी बंधारे भरून शेतीसाठी व जनावरांच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी बांधवांनी आमदार मनोज कायंदे यांचे आभार मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा