उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदखेड राजा तालुक्यातील इरफान अली शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रदीप वाघ आणि युवक जिल्हा उपाध्यक्ष यासीन शेख यांचीही विशेष उपस्थिती होती. इरफानअली शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यानंतर उपस्थित मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा