बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचा पुण्यात उडतोय फज्जा
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरांमधून धक्कादायक,तितकीच संताप आणणारी घटना समोर आली आहे. पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वारगेट एसटी स्टँड मध्ये उभे असलेल्या शिवशाही बस मध्ये अंधाराचा फायदा घेत २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संताप जनक घटना समोर आली आहे.
पहाटे अंधाराचा फायदा घेत एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून आरोपी हा शिरूरचा असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीवर शिरूर, शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा जामीनावर बाहेर होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५:३० वाजता ही धक्कादायक घटना पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर आहेत. शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातून आरोपीच्या भावाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्वारगेट बस स्टॅन्ड मध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह, पुणे व परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे शहरात आज पहाटे ५:३० वाजता स्वारगेट एसटी बस स्टॅन्ड वर उभ्या असणाऱ्या शिवशाही बस मध्ये बलात्कार केल्याची संताप जनक घटना घडली आहे. सदर तरुणी एकटीच असल्याचा फायदा घेत नराधमाने तरुणीवर बलात्कार केला, त्यानंतर तिथून पळ काढला. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
पुण्यात कामाला असणारी २६ वर्षीय तरुणी पुण्यामधून फलटण च्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर नेहमीच्या ठिकाणी थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी बस याच ठिकाणी थांबते, मी तिकडे जाणार नाही असं त्या तरुणीने आरोपीला सांगितलं. मात्र एकट्या तरुणीचा फायदा घेत त्या नराधमाने त्या तरुणीला त्याच्या शब्दात अडकवले.
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. त्या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने एसटी बस बंद आहे असे देखील सांगितले. तू टॉर्च लावून आत मध्ये जा,इतर प्रवासी झोपले आहे, हीच एस टी काही वेळात फलटणला निघेल;अस त्या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तेथून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार तरुणीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांच्या विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा