पहिल्याच दिवशी भव्य कृषी दिंडीचे केले आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
लोणंद मध्ये शरद कृषी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे त्याचा एक भाग म्हणून आज सकाळी दहा वाजता डॉक्टर नितीन सावंत विचार मंचच्या वतीने भव्य कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले. लोणंद नगरपंचायत इमारती पासून दिंडीचे पूजन करून सुरू झाली. नगरपंचायत ते सातारा रोड, खंडाळा रोड, मार्गे कृषी प्रदर्शन समोर दिंडीचा समारोप झाला.
या दिंडीमध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मधुमती गालींदे पलंगे, नगरसेवक राजश्रीताई शेळके पाटील, दिपालीताई शेळके पाटील, तृप्ती ताई घाडगे, शैलजा काकी खरात, डॉ.सुभदा सावंत, मालोजी राजे मुलींचे विद्यालय लोणंदच्या प्राचार्य चव्हाण मॅडम, नेवसे मॅडम, शरदचंद्र प्राचार महाविद्यालयचे उपप्रचार्य काकडे सर, स्वप्निल क्षीरसागर, अमोल यादव, उमेश डोईफोडे, खताळ पाटील, इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.
प्राचार्य चव्हाण मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज शाळेतील मुला मुलींना शेतीविषयक माहितीचे ज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे बटाट्याचे पीक कसे असते त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्य कसे पिकवायचे ही सर्व माहिती मुलांना लहान वयातच मिळणे गरजेचे आहे या कृषी प्रदर्शनातून ही माहिती सर्व मुलांपर्यंत मिळणार आहे सर्वांनी आपले मुले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणावे तसेच डॉ. नितीन सावंत यांनी कृषी प्रदर्शनात मधील पाच दिवसाचा संपूर्ण लेखाजोखा समजावून सांगितला व सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी कॉलेज विद्यालय मधील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा