अभिष्टचिंतन व महेशबापू ढमढेरे संपादित शिक्षणतपस्वी चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
सेवा, त्याग आणि समर्पण हीच अरविंददादा ढमढेरे यांच्या जीवनाची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन शिरूर - हवेलीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे विद्यमान मानद सचिव व पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अरविंददादा साहेबराव ढमढेरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व महेशबापू अरविंददादा ढमढेरे यांनी संपादित केलेल्या शिक्षणतपस्वी या चरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार कटके बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती सिंधुताई ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलदादा पाचरणे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलासराव सोनवणे, शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजूकाका ढमढेरे, विद्या सहकारी बँक आणि शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे, संचालक विजयकुमार गुजर, परेश सातपुते, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, रायकुमार बी. गुजर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, सौ. उषाताई नलगे, माजी प्राचार्य डॉ. अशोक नवले आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आमदार कटके पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अरविंद दादा यांचे समृद्ध आणि संपन्न असे व्यक्तिमत्व आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना त्यांचे कार्य सदैव दीपस्तंभासारखे प्रेरणा देत राहणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले. शिक्षण, सहकार, सामाजिक, राजकीय, कला आणि क्रीडा या सर्वच क्षेत्रांमध्ये योगदान देणारे दादांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचेही ते म्हणाले. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समृद्ध आणि पुरोगामी विचारांचा वारसा अरविंद दादा यांनी समर्थपणे पुढे चालविला असल्याचे गौरवोद्गार आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी याप्रसंगी काढले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते यांनी आपल्या भाषणात अरविंददादा ढमढेरे यांच्या सोबतचा सार्वजनिक जीवनातील प्रवास कथन केला. तळेगाव ढमढेरे परिसरातील सर्वसामान्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अरविंद दादा ढमढेरे यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे भाग्य आम्हास मिळाले असल्याचेही श्रीकांत भाऊ सातपुते यांनी सांगितले. शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आम्ही शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर यांनी दादांसोबतचे सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक अनुभव व्यक्त केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलदादा पाचरणे यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्तर देताना अरविंददादा ढमढेरे यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाटचालीस ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे ऋण व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीमधून, पदोपदी संघर्ष केल्यानेच सर्वांच्या सहकार्यामुळे आज शिक्षण प्रसारक मंडळाची यशोगाथा निर्माण होत असल्याचेही अरविंददादा ढमढेरे यांनी सांगीतले.
समारंभास पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, अनिलशेठ ढमढेरे, माजी जि. प. सदस्या उषाताई बढे, अँड. सुप्रिया साकोरे, ऋतुराज महेशबापू ढमढेरे, डॉ. सुजीत शेलार, स्वप्निलभैया गायकवाड, विजय ढमढेरे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, सचिन शेलार, युवा उद्योजक अमित शेलार, अशोकराव सोनवणे, सदाअण्णा थोरात, माजी मुख्याध्यापक माणिकराव सातकर, श्री. जगदीश राऊतमारे यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी प्रास्ताविक केले. श्री. कुंडलिक कदम यांनी 'शिक्षणतपस्वी' या चरित्र ग्रंथाविषयी माहिती दिली. डॉ. पराग चौधरी यांनी श्री. अरविंददादा ढमढेरे यांच्या मानपत्राचे वाचन केले. मान्यवरांचे स्वागत जालिंदर आखाडे यांनी तर दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले . डॉ . दत्तात्रय वाबळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी आभार मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा