जीवीत हानी नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
समृद्धी महामार्गावर आज दिनांक 1जानेवारी 2025 रोजी सकाळी 09.40 वा दरम्यान समृद्धी महामार्ग चायनैल क्रमांक 328.8 मुंबई कॅरी डोअर वर नादुरुस्त असलेला ट्रक क्रमांक MH-46-BB-0386 चा चालक प्रदीप कुमार पाल वय 23 वर्ष मिर्झापूर उत्तर प्रदेश हा सदर ट्रक ब्रेक डाऊन झाल्याने त्यांच्या कंपनीचा दुसरा ट्रक क्रमांकCG-04-PE-7301 ला पाठीमागून साखळदंड बांधून सिंदखेडराजा टोल प्लाजा येथे सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असताना सदरील ब्रेक डाऊन झालेला ट्रक समृद्धी महामार्गावर रिव्हर्स आला त्यावेळी पाठीमागून रिकामे असलेले गॅस टँकर क्रमांक MH-10-CR-5768 नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जात असताना समोरील ट्रक गॅस टँकरला रिव्हर्स मध्ये भिडला.
यामध्ये गॅस टँकरचे केबिन पूर्णपणे चुराडा झाले. व टँकर चालक रफिक अहमद वय 38 वर्ष प्रतापगड उत्तर प्रदेश हे त्यामध्ये जखमी झाले व. त्यांना तात्काळ समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका 108 चे डॉक्टर यासीन शहा व चालक राठोड यांनी तात्काळ उपचार केला व सिंदखेड राजा टोल प्लाझा येथील QRV टीमचे श्रीकांत काळे, राहुल पवार, पृथ्वीराज राठोड यांनी सदरील जखमी चालक यांना बाहेर काढले . RTO निरीक्षक स्वप्निल वानखेडे व प्रियंका काळे व महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर ,पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश जाधव, हरिओम काकडे व महाराष्ट्र सुरक्षा बल चे भगवान गायकवाड,
व इतर यांनी सदर अपघातग्रस्त दोन्ही वाहने अथक प्रयत्नांनी क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने यामध्ये प्राणहानी टळली कारण पाठीमागून येणारा टँकर हा नेहमीच्या स्पीडने चालत असताना अचानक समोरील ट्रक रिव्हर्स आल्याने टँकरच्या ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा