शहिदांना अभिवादन करण्यासाठी उभारणी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी येथील संघर्ष भूमी या ठिकाणी एक मोठा इतिहास असून नामांतरासाठी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर ते मुंबई असा लाखो कार्यकर्त्यांसह लॉन्ग मार्च काढण्यात आला होता हा लॉंग मार्च भव्य अशा प्रमाणात असल्यामुळे सरकारला सुद्धा इतरत्र ठिकाणी तो थांबवणे शक्य झाले नाही म्हणून राहेरीचा वनवे असा असलेला भव्य असा पूर्णा नदीवरील पूल या ठिकाणी हा मोर्चा थांबवण्याचे सरकारकडून नियोजन करण्यात आले मात्र प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या सोबत असलेले भीमसैनिक हे मोठ्या जोशात आणि तितक्याच रागात हा मोर्चा घेऊन निघाले होते.
या ठिकाणी पोलिस आणि भीमसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात झडप सुद्धा झाली काही भीमसैनिक या ठिकाणी शहीद झाले तीच पार्श्वभूमी राहेरीला असून 35 ते 40 वर्षापासून या संघर्ष भूमीवर हजारो लाखो भीमसैनिक शहिदांना अभिवादन करण्यासाठी येत असतात बरेच वर्ष झाली येथे सरांच्या माध्यमातून कामाला सुरुवात होत होती मात्र काही कारणास्तव काम पूर्ण होत नव्हतं आज मात्र पूर्णपणे या कामाला सुरुवात झाली असून या संघर्ष भूमीवर भव्य असा 50 फुटाचा स्तंभ शहिदांची आठवण म्हणून उभा राहत आहे.
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंदखेडराजा लोणार चिखली, देऊळगाव राजा येथील भीमसैनिकांचा स्वप्न पूर्ण होत आहे त्याच माध्यमातून आज प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी चालू झालेल्या कामाची पाहणी केली यावेळेस या कामावर नियुक्ती केलेली समिती भाई गौतम कासारे यांच्या माध्यमातून या कामावरती देखरेख ठेवण्याचे काम संपूर्ण जबाबदारी ही भाई गौतम कासारे यांच्याकडे देण्यात आली असून यावेळेस चरणदास इंगोले सर. भाई भिकाजी इंगळे. भाई कैलास नरवाडे भाई मधुकरराव शिंदे. सुनील भाऊ इंगळे. अमोल गवई. बळी भाऊ मोरे. विनोद इंगळे. संतोष हिवाळे. विकास कासारे. आर्किटेक शरद खरात. इंजिनीयर शिवकुमार जायभाये अशी अनेक कार्यकर्ते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर सोबत होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा