अनेक लहान व्यावसायिकांना दिले होते पाठबळ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज येथील ज्येष्ठ व्यापारी किरण बाबुराव तांबोळी (वय ७३) यांचे गुरुवारी दि. 13 रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत अस्वस्थ होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या व्यवसायातून अनेक लहान व्यावसायिकांना पाठबळ देण्याचे, अनेकांना मदत करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले.
त्यांच्या पार्थिवावर भुईंज येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ बंधू, भावजया, मुलगा, मुलगी, पुतणे, सूना, जावई असा परिवार आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा