आमदार अभिजीत पाटील व आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून आणि घोड्यावरून निघाली मिरवणूक
शिवशाही वृत्तसेवा, माढा
माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे व बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सत्कार करत मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामदैवत बालिंगेश्वर व विठ्ठल रुक्मिणी मातेस नतमस्तक होऊन ग्रामस्थांनी मतदानरुपी आशीर्वाद दिल्यामुळे हे परिवर्तन घडले आणि हा विजय मिळाला. निवडणुकीच्या संघर्षात बावीच्या अनेक सहकार्यांनी सर्वांच्या पुढे येऊन सहभाग घेतला. बावीमध्ये बैलगाडा शर्यतीमुळे विजयाचे वातावरण निर्माण झाले. बावीकरांच्या सत्काराने मला दहा हत्तीचे बळ मिळाले. बावी गावाला सीना-माढा योजनेचे पाणी आणल्यावरच गावात फेटा बांधणार हा संकल्प मी केला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे व बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे व माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत पाटील यांची बगीतून मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांनी जेसीबी द्वारे फुलाची उधळण करत नागरी सत्कार केला.
यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेड दिनेश जगदाळे, बालाजी पाटील, जिल्हा युवती जिल्हाध्यक्षा विनंती कुलकर्णी, डीएस मोरे महाराज, कुरण गिड्डे, सयाजी पाटील, राजाभाऊ पाटील, अनिल मोरे, लक्ष्मण मोरे, निलेश पाटील, उल्हास मोरे, दयानंद महाडिक देखमुख, पप्पू मोरे, सुरज मोरे, स्वप्नील मोरे, शुभम मोरे, आकाश मोरे, सुदर्शन मोरे, आदर्श मोरे, तेजस मोरे, निखिल मोरे, रामराजे मोरे, नागेश मोरे, केदार मोरे यासह आदी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा