maharashtra day, workers day, shivshahi news,

नेवपुर परिसरामध्ये बकऱ्या चोरणाऱ्या दरोडेखोरांच्या आवळ्यांच्या मुस्क्या - तीन गुन्हे उघडकीस

आडीच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त, पिशोर पोलिसाची मोठी कारवाई

Goat stealing robbers, arrested by police, kannad, chhatrapati sambhaji nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे)
पोलीस ठाणे पिशोर हद्दीमध्ये, वाकी शिवारातुन पुष्पा ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या मालकीच्या ३०,०००/- रुपये किमतीच्या दोन बकऱ्या, तसेच सावरगांव शिवारातुन गजानन तेजराव हराळ यांच्या मालकीची २०,०००/- रुपये किंमतीची एक बकरी, अशा ०३ बकन्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या होत्या. त्या बाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नं ४१/२०२५ व गुरनं ४२/२०२५. कलम ३०३(२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते.
पोलीस ठाणे पिशोर हद्दीमध्ये, जनावर चोरी प्रकरणाचे वाढते सत्र लक्षात घेऊन, मोहरा गांव, नेवपुर शनि-मंदीर चौफुली, दिगांव फाटा, गौरप्रिरी, करजखेडा खांडी, नागापुर इत्यादी ठिकाणी टप्या-टप्याने दररोज रात्रीच्या वेळेस नाकाबंदी लावुन, जनावर चोरी रोखण्यासाठी उपाय-योजना आखण्यात आली होती. दरम्यान परिसरातील रस्त्याने राहत असलेले शेतकरी यांना जनावर चोरीची टोळी बाबत अवगत करण्यात आले होते.
दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या रात्री पोलीस संतोष घुनावत व ०३ होमगार्ड यांची नेवपुर शनिमंदीर चौफुली येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. ते सदर ठिकाणी, हजर असतांना, सदर पॉईटवरुन थोड्या अंतरावर असलेले गोकुळ परसराम राऊत (रा.नेवपुर ता.कन्नड) यांचे नेवपुर शिवारामधील शेडमधुन बकरी चोरी करण्यासाठी पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडीमध्ये आलेले ०५ दरोडेखोरांनी रात्री ११.०० वाजेच्या दरम्यान गोकुळ राऊत यांना धक्काबुकी करुन, इंडिगो गाडीमध्ये बकरी चोरुन, घाटशेंद्रा रोडने सुसाट वेगाने निघालेले असतांना, गोकुळ राऊत यांनी घाटशेंद्रा येथील पोलीस पाटील व गांवकऱ्यांना तसेच नाकाबंदीसाठी असलेले घुनावत व होमगार्ड यांना माहिती दिली. सदरची माहिती शिवाजी नागवे यांना तसेच रात्रगस्तचे दत्तु लोखंडे यांना मिळाल्यानंतर, तात्काळ त्याची दखल घेऊन, पळुन जात असलेले बकरी चोर-दरोडेखोरांचा स.पो.नि. शिवाजी नागवे, पोलीस हवालदार विलास सोनवणे, दत्तु लोखंडे, संतोष घुनावत, गणेश कवाल, करण म्हस्के, होमगार्ड यान्ही नेवपुर व घाटशेंद्रा परिसरामध्ये शोध सुरु केला. घाटशेंद्रा रोडच्या बाजुला बकरी चोरी करणारी टोळीतील चोर-दरोडेखोर हे त्यांच्या ताब्यात असलेली इंडिगो गाडी हि भरधाव वेगाने अरुंद रोड असलेल्या रस्त्यावरुन संतुलन सुटल्याने, अपघातग्रस्त स्थितीमध्ये मिळुन आली होती. सदर ठिकाणावरुन दोन दरोडेखोर हे अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेलेले होते व तीन दरोडेखोर हे जखमी अवस्थेमध्ये मिळुन आले होते.


गोकुळ परसराम राऊत यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे येथे दाखल दरोड्याचा गुन्हा नं. ४०/२०२५ कलम ३१०(२) भा.न्या. सं. या गुन्हयांमध्ये फैजान शेख निजामोद्दीन शेख तय १९ वर्षे, शेख सलीम शेखा सांडु वय २३ वर्षे दोन्ही रा. हसनाबाद जि. जालना व रईस सरदार शहा वय २२ वर्षे रा. सिरसगांव मंडप ता. भोकरदन यांना अटक करुन, त्यांचा मा. न्यायालयाकडून दि. २०/०२/२०२५ रोजी पर्यत पी. सी.आर. घेण्यात आलेला आहे. पी.सी.आर. दरम्यान, रईस सरदार शहा यांनी सिरसगांव मंडप ता. भोकरदन येथील सहते घरातुन चोरी केलेल्या ३५,०००/- रुपये किमतीच्या ०२ बकऱ्या काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच गोकुळ राऊत याच्या मालकीची १५,०००/- रु. किंमतीची बकरी जप्त करण्यात आलेली आहे. या गुन्हयांमध्ये एकुण ५०,०००/- रुपये किमतीच्या ०३ बकच्या जप्त करण्यात आलेल्या 'असुन, आरोपींनी गुन्हयात वापरलेली २,००,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडी जप्त करण्यात आली आहे. असा एकुण २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन, पोलीस स्टेशनला दाखल ०३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  डॉ. विनयकुमार राठोड सो.. अपर पोलीस अधीक्षक  सुनिल लांजेवार साो.. उप विभागीय पोलीस अधिकारी, कबड विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक स्था गु.शा.  सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे, पोलीस उप निरीक्षक श्री रतन डोईफोडे, श्री विश्वजीत फरताडे पोलीस हवालदार विलास सोनवणे, दत्तु लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश कवाल, करण म्हस्के, संतोष घुनावत, चा.पो.अ. मच्छिंद्र देवरे तसेच नागरीक प्रेम जंजाळ, पोलीस पाटील देशमुख,  प्रविण सासमकर यांनी केलेली आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !