maharashtra day, workers day, shivshahi news,

वाई सराफ बाजारातील जबरी चोरीचा गुन्हा उघड

वाई पोलीसांनी ४ आरोपींना केली अटक

Crime of theft in Saraf market revealed, police, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई मध्ये दि.२८ जुलै २०२४ रोजी वाई सराफ बाजारातील, सोन्याचे दागिने बनवणा-या कारखान्यातील कामगारांना पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी करण्यात आलेली होती. 

सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास तांत्रिक तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सुरु असतांना माणिकपुर पोलीस ठाणे वसई विरार येथे एक दरोड्याचा गुन्हा घडल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपीत १) अनुज गंगाराम चौगुले २.) रॉय उर्फ रॉयल एडव्हर्ड सिक्वेरा दोघे रा. नालासोपारा वसई विरार यांना माणिकपुर पोलीसांना अटक केल्यानंतर त्यांनी असाच वाई येथे जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर दोन्ही आरोपीचा वाई पोलीसांनी ताबा घेऊन त्यांस अटक करण्यात आली. 

त्यांचेकडे अधिकचा तपास केला असता, वाईतील धर्मपुरी पेठेत कापडाचे दुकान असणारे व्यापारी सुधीर गणपत शिंदे वय ५६ वर्षे, रा. शौर्य अपार्टमेंट गंगापुरी वाई हा सिताराम चोरट, अनुज चौगुले व रॉय सिक्वेरा असे वाई मध्ये एकत्र आले. एकत्र आलेनंतर रात्री उशिरा सुधीर शिंदे यांनी सर्वांना वाईमधील ज्वेलरी परिसर दाखविला त्यामध्ये त्यांनी आवर्जुन संजय माइती व मृत्युंजय माइती यांची दोन सोन्या चांदीच्या दागिने बनविण्याचे कारखाने दाखवले. 

त्यावेळी तेथे सोन्याचांदीचे दागिने बनविण्याचे काम सुरु होते. त्यावेळेस सुधीर शिंदे व सिताराम चोरट याने अनुज व रॉय यांना सदर भागातील दुकाने हि रात्री ९ वाजता बंद होत असल्याचे सांगुन सदर दोन सोन्याचांदीचे दागिने बनविणारे कारखाने हे रात्री उशिरापर्यंत चालु असल्याबाबत सांगितले तसेच सदर दुकानात मोठमोठे सोन्याचे दागिने बनविले जात असुन भरपुर प्रमाणात सोने सदर कारखान्यामध्ये असल्याबाबत सांगितले. तसेच सिताराम चोरट याने वाईमध्ये येणारे व जाणारे संपुर्ण रोड हे आरोपीना दाखवुन सीसीटीव्हीमध्ये न येता कोणत्या रोडचा वापर करायचा याची संपुर्ण माहिती त्यांस पुरविली

अशी सर्व माहिती घेवुन आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी रात्री उशिरा चोरी कशी करायची याचा कट रचला. त्यानुसार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी  अनुज गंगाराम चौगुले व रॉयल उर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा यांनी यापुर्वीच जुन २०२४ मध्ये पुणे येथील स्वारगेटमधुन एक निळ्या रंगाची बजाज अव्हेंजर गाडी हि चोरी करुन कोल्हापुर मध्ये जावून सदर गाडीस काळ्या रंगाचा पेंट करुन आणुन ती वाई मध्ये घेवुन येवुन शहाबाग फाटा वाई येथे येवुन थांबले व सिताराम चोरट याचे फोनची वाट पाहु लागले रात्री सव्वानऊ  वाजताच्या सुमारास सिताराम चोरट याने फोन करून दोघांना वाई मध्ये बोलावुन घेतले त्यानुसार सदर दोघांनी एक पिस्टल, कोयता या हत्यांरासह वाई ज्वेलरी परिसरात येवुन पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवुन ठरल्याप्रमाणे सोन्याचे दागिने बनविणाऱ्या दोन कारखान्यांमध्ये जावुन जबरी चोरी करुन ते दुचाकीने पुणे बाजुकडुन भोरमार्गे माहाड येथे निघुन गेले 

त्यादरम्यान त्यांनी नागोठाणे येथे त्यांनी चोरी करुन आणलेली व वाईमधील जबरी चोरी करतांना वापरलेली मोटारसायकल सोडुन दिली सदर टुव्हिलर हि नागोठाणे येथे बेवारस स्थितीत मिळुन आली असुन त्यानंतर आरोपींनी सदर चोरलेले दागिने है कोईम्बतूर, राज्य तामिळनाडु, वसई येथे विकले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने आरोपींची १० दिवसाची पोलीस कोठडी घेवुन वाई पोलीसांनी कोईम्बतूर राज्य तामिळनाडु व वसई येथे जावुन तपास करुन मिळाले माहितीवरुन सदर गुन्ह्यातील ४,१५,१५२/- रुपये किंमतीचे एकुण ५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने प्राप्त केलेले असुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा मोठ्या प्रमाणात असल्याने यामध्ये उर्वरित मुद्देमाल हस्तगत करणे अद्यापही बाकी असुन मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम प्रगतीपथावर असुन सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरु आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वाई पोलीस ठाण्याचे तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो  समीर शेख अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी  वाई विभाग  बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक  श्याम पानेगावकर, पोलीस निरीक्षक  जितेंद्र शहाणे, सहा पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.हवा अजित जाधव, पो. कॉ प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रवण राठोड, विशाल शिंदे, गोरख दाभाडे, धिरज नेवसे, स्नेहल सोनावणे यांचे पथकाने केलेली आहे. मा पोलीस अधिक्षक  समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन केलेले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !