maharashtra day, workers day, shivshahi news,

अनधिकृत सेंट चावरा स्कूलने शासन निर्णयाची पायमल्ली करीत - पालकांची केली फसवणूक

मराठी माध्यमाची परवानगी घेऊन इंग्रजी माध्यमातील वर्ग सुरू केले

Chawra School cheated parents , shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

सरदवाडी (ता. शिरूर) – शासनाची कोणतीही मान्यता नसताना गेली ७-८ वर्षे सेंट चावरा स्कूल, सरदवाडी येथे बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासन निर्णयानुसार, शाळांना परवानगी मिळालेल्या माध्यमात बदल करता येत नाही. मात्र, या संस्थेने मराठी माध्यमाची परवानगी घेऊन इंग्रजी माध्यमातील वर्ग सुरू केले आहेत.

या प्रकारामुळे शासन निर्णयाची पायमल्ली झाली असून, पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शाळेला U-DISE क्रमांक नाही, अंतिम मान्यता नाही, तसेच शालेय संहिता नियमावली १९८१ चा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संस्थेवर शासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठी भाषेचा अपमान, तीव्र आंदोलनाचा इशारा

मराठी राज्यात मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा हा प्रकार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मराठी माध्यमाची परवानगी असतानाही इंग्रजी माध्यम चालवणे हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, मनसेचे शिरूर सचिव रवि लेंडे यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे

  • अनधिकृतपणे सुरू असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा 
  • शासन निर्णयाचा भंग, परवानगी नसताना शाळा चालू
  • U-DISE क्रमांक आणि अंतिम मान्यता नाही
  • मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप
  • तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा मनसने दिला आहे

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !