ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, व सुश्राव्य कीर्तन असे कार्यक्र
शिवशाही वृत्तसेवा, मंचर
वै. ह.भ.प. निवृत्ती महाराज गायकवाड (आदर्श ग्राम गावडेवाडी) यांनी सुरू केलेल्या पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरातील सप्ताहाला २८ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अन्वये माऊलीच्या पायी वारी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने या ही वर्षी रविवार दिनांक २ मार्च ते रविवार दिनांक ९ मार्च असा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती सप्ताहाचे संयोजक व अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे सरचिटणीस ह.भ.प.पत्रकार मधुकर महाराज गायकवाड यांनी दिली आहे.
या सप्ताहात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा बरोबरच ह.भ.प. गणेश महाराज हिंगे (अवसरी बुद्रुक), ह.भ.प. संतोष महाराज गावडे (आदर्शगाव गावडेवाडी ), ह.भ.प.दीनानाथ महाराज शिंदे (आदर्श गाव गावडेवाडी), ह.भ.प.संजीवनीताई मंडलिक - गायकवाड (लांडेवाडी), ह.भ.प.प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड ( मंचर ), ह.भ.प.डॉ. हेमलताताई नंदकुमार सोळवंडे - गायकवाड (काळेवाडी) पुणे, ह.भ.प. रवींद्र महाराज कांबळे (गुलटेकडी) पुणे, ह.भ.प.नानासाहेब महाराज लोंढे (राजगुरू नगर, खेड), ह.भ.प. संभाजी महाराज लोंढे (पुणे), ह.भ.प.किशोर महाराज उगले (बीड), ह.भ.प. दीपक महाराज टेंबेकर (अवसरी खुर्द), ह.भ.प. पंढरीनाथ महाराज तांबे मा.प्राचार्य (अवसरी खुर्द), ह.भ.प. धोंडीभाऊ महाराज शिंदे (अवसरी खुर्द), ह.भ.प.नंदकिशोर महाराज लोंढे धायरी (पुणे) यांची प्रवचन सेवा होणार आहे.
त्याच बरोबर या सप्ताहात ह.भ.प. तान्हाजी महाराज तांबे (शिरदाळे), ह.भ.प.संदीप महाराज गावडे (आळंदी), ह.भ.प. दत्तात्रय महाराज रुकारी (कोल्हारवाडी), ह.भ.प.नामदेव महाराज वाळके (वेळेश्वर मंदिर संस्थान, कुरवंडी), ह.भ.प. अशोक महाराज हाकाळे (गेवराई,बीड ), ह.भ.प. गणेश महाराज ढगे (गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था,पंढरपूर), ह.भ.प. संगीत अलंकार भीमाताई ज्ञानदेव लोंढे (वारू,ता .मावळ), यांची कीर्तन रुपाने सेवा होणार आहे. या सप्ताहाची सांगता रविवार दिनांक ९ मार्च रोजी पत्रकार ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड (आदर्शगाव गावडेवाडी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. महाराष्ट्रातील तमाम भाविक या सप्ताहास हजेरी लावणार आहेत. सर्व भाविकांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा आणि या सप्ताहाला हजेरी लावावी असे आवाहन, अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे पदाधिकारी, अधिकारी व सप्ताहाचे संयोजक पत्रकार ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड यांनी केले आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा