एक कारसह ३२ किलो गांजा असा१४लाख ४२हजार ६८० रू किंमतीचा मुददेमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपुरात दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदार हे व्हिआयपी बंदोबस्ताचे अनुषंगाने पंढरपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना, मंगळवेढा पंढरपुर रोडवरील लिंगायत स्मशानभुमी समोर अंधाऱ्या जागेत एक पांढऱ्या रंगाची हयुंडाई आय ट्वेण्टी गाडी नंबर एमएच १३ बीएन ९६२२ ही संशयास्पद रितीने उभी असलेली दिसली. संशय आल्याने संशयित गाडीला पोलीस स्टाफने गराडा घातला. गाडी चालक व मागील सीटवर बसलेल्या आणखीन तीन महिला दिसल्या. संशयितांकडे अधिक चौकशी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये सिलबंद पॉकेट मिळाले. त्या पाकीटांना उग्र आंबूस वास येत असल्याने कारसह संशयित तीन महिला व एक पुरुष यांना चौकशीसाठी पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे आणून चौकशी केली असता, गाडीमध्ये तब्बल ३२.१३४ किलो ग्रॅम वजनाचा ६लाख४२हजार६८० रूपये कींमतीचा गांजा असल्याने त्यांचेविरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा रजि नं १२७/२०२५ एनडीपीएस कायदा कलम २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल केला असुन यामध्ये ०३ महिला व ०१ पुरुष असे एकुण ०४ आरोपीं अटक केलेले आहेत
सदर आरोपींकडुन खालीलप्रमाणे मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.१) ६,४२,६८०/- रू. अंदाजे किंमतीचा प्रतिबंधित गांजा३) ८,००,०००/- रू किं एक पांढरे रंगाची हयुंडाई कंपनीची आय २० गाडी नं एमएच१३बीएन९६२२एकुण १४,४२,६८०/- किंमतीचा मुददेमाल आरोपी व कार सह ताब्यात घेतला.
सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकार्र पंढरपूर विभाग, डॉ.अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके, यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे, श्रेणी. पोसई राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, कल्याण ढवणे, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोकॉ शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे, मपोका रेश्मा सांगोलकर सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे. पुढील तपास सपोनि भारत वाघे करीत आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा