महामार्ग पोलिसांकडून दैनंदिन प्रबोधन आणि कारवाई मोहीम
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दैनंदिन प्रबोधन आणि कारवाई मोहीमही राबविली आत आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची हद्द जिल्ह्यात आहे. महामार्गावर प्रवास सुरु झाल्यानंतर सातत्याने अपघात होत होते, त्यामुळे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या चालकांवर स्पीडगन मशीनद्वारे दंडात्मक कारवाई होत आहे. असे असले तरी मागील वर्षात समृद्धी महामार्गावर १२४ अपघात झाले आहेत. त्यातील ९ अपघातांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. १० अपघातांत १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ३४ अपघातांत ५२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने ७१ अपघातांत कोणीही जखमी झालेले नाही.
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहन चालकांवर स्पीडगन मशीनद्वारे दैनंदिन दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय मद्यप्राषण करून कोणी वाहन चालवीत असेल तर असा चालकांचर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.
टायरमध्ये हवी नायट्रोजन हवा
समृद्धी महामार्गावर वाहन नेताना शक्यतो टायर चांगले असणे गरजेचे आहे. त्यातही टायरमध्ये नायट्रोजन हवा असेल तर टायर थंड राहतात. त्यामुळे प्रवासादरम्यान टायर गरम होऊन फुटण्याची भीती कमी होते.
पेट्रोल पंपावर थांबणाऱ्या चालकांचे प्रबोधन
महामार्गावर ट्रकसाठी ८०, तर कारसाठी १२० ची वेगमर्यदा समृद्धी महामार्गादर तीन लेन असून, त्यातील डाव्या लेनमध्ये ट्रक चालतात. त्या ट्रकसाठी ताशी ८० चीं देगमर्यादा निश्चित करून दिली आहे. दुसया लेनमधे कार धावतात, कारला ताशी १२० ची वेगमर्यादा आहे. चालकाच्या उजवीकडील लेनचा वापर हा समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी करणे गरजेचे आहे.
८० किलोमीटर प्रवासानंतर थांबा
1) समृद्धी महामार्गावर टॉप गिअर टाकला की नंतर गिअर बदलण्याची वेळ येत नाही. त्यामुळे अधिक स्पीडने वाहने चालविली जातात. अशावेळी चालाकाला झोप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान ८० किलोमीटरचा प्रवास आल्यानंतर पेट्रोलपंपाच्या पार्किंगमध्ये वाहन धांबवणे गरजेचे आहे.
2) ओव्हरटेक करताना काळजी घ्या समृद्धी महामार्गावर झालेले अपघात पाहता ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अधिक झाले आहेत. त्यामुळे ओवरटेक करताना समोरील अंदाज बांधून वाहनांच्या समोरील बाजूने ओव्हरटेक करावे, वाहन ओव्हरटेक करताना हॉर्न वाजविणे गरजचेच असते.
3) वाहन चालवीत असताना सीटबेल्ट लावावा,
असे आवाहन करण्यात आले ओव्हरस्पीड चाहनांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई समृद्धी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी करत आहे
वाहतूक नियमांचे पालन करावे
- समृद्धी महामार्गावर टू व्हीलर व थ्री व्हीलर वाहनांना सक्त मनाई आहे
- वाहन ओव्हरटेक करताना काळजी घेऊन ओव्हरटेक करावे.
- 80 किलोमीटर प्रवासानंतर पेट्रोल पंप पार्किंग मध्ये थोडं थांबावे.
- असे आव्हान समृद्धी महामार्ग वाहतूकचे पीएसआय उज्जेंकर यांनी केले आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा