शिरवळ शिंदेवाडी येथील खड्डा बनलाय यमदूत
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ शिंदेवाडी येथे खड्डा चुकवताना गाडीचा वेग कमी केल्याने दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसून अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी दि.१२ रोजी पुणे बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी परिसरात रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्यासाठी दुचाकीचा (क्र.एम.एच.०१-डी.जे.८३६५) वेग अचानक कमी केला. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकची (क्र.पी.बी.०६-ए.यु.९९९५) दुचाकीला जोरदार धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रुबल सिन्हा (वय-२६वर्षे,रा.ओडीसा,सध्या रा.पुणे) ही गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली तर दुचाकीचालक शहाऊद शेख (वय-३३वर्षे, रा. सय्यद मोहल्ला, एरंडोल, जळगाव, ता.जि. जळगाव) हा गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव,पोलीस अंमलदार अरविंद बाऱ्हाळे,भाऊसाहेब दिघे तात्काळ घटनास्थळी पोहचले.
शिरवळ ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. या अपघाताबाबत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हे करीत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा