पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट तसेच विध्यार्थी-विद्यार्थ्यीनी यांच्या पथकाने केलेल्या संचलन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर, (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण 32 पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट तसेच शहरातील विविध विद्यालयाच्या विध्यार्थी-विद्यार्थ्यीनी यांच्या पथकाने केलेल्या संचलनाचे प्रांताधिकारी श्री. इथापे यांनी निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.
शासकीय ध्वजारोहण समारंभास माजी आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पोलीस निरिक्षक विश्वजित घोडके, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, विजयकुमार जाधव, वैभव बुचके, उप कार्यकारी अभियंता भिमाशंकर मेटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह स्वांतत्र्यसैनिक, पदाधिकारी, शासकीय अधिकारी- कर्मचारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञा देण्यात आली व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तसेच पोलीस दलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी इथापे यांच्या हस्ते सहभागी पथकांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात आले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा