maharashtra day, workers day, shivshahi news,

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचा दिमाखदार उदघाटन सोहळा

वाई जिमखाना व किसनवीर महाविद्यालय यांच्या पुढाकाराने पुर्प्रण झाला प्रकल्प

Grand Opening of Badminton Court, chhatrapati vrushaliraje bhosale, madan bhosle, shivshahi news wai, satara,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडारसिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट्सचा लोकार्पण सोहळा सातारा जिल्हा बॅडमिंटन असो. अध्यक्षा छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या शुभहस्ते, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मा. आ. मदन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

वाई सारख्या छोट्या शहरात अंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट उभारणे ही कौतुकाची बाब असून वाई जिमखाना व किसनवीर महाविद्यालय, वाई यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प हाती घेतला व यशस्वीरीत्या पूर्ण केला. याबाबत छ. वृषालीराजे भोसले यांनी विशेष कौतुक केले. यामुळे अधिकाधिक खेळाडू घडतील व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील, अशी खात्री देखील व्यक्त केली. तसेच स्व. प्रतापराव भाऊ भोसले यांच्या स्वप्नातील हा हॉल सुसज्ज झाला असून अयोजकांनी छ. वृषाली राजे भोसले यांच्याकडे दरवर्षी स्व. प्रतापराव भाऊंच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेला संमती दिली. 

धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण कमी करण्यासाठी खेळासारखा उत्तम प्रकार कुठलाच नसून प्रत्येकाने आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळाचा छंद जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन मा. आ. मदन भोसले यांनी केले. तसेच २०१४ पासून या हॉलचे काम सुरू होते. वाई जिमखाण्याच्या नेतृत्वामुळे केवळ हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे, असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. आ. मदन भोसले यांनी याठिकाणी व्यक्त केले. 

किसनवीर महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी कायम प्रयत्नशील असतेच, या बॅडमिंटन हॉलची उभारणी हे विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात देखील नामलौकिक मिळावा यासाठी झालेली आहे, असे वक्तव्य किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. वाई जीमखान्याचे अध्यक्ष अमर कोल्हापुरे यांनी वाई जिमखान्याअंतर्गत सुरू होणाऱ्या या तिसऱ्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक स्व. आनंद कोल्हापुरे यांचे सशक्त व सुदृढ पिढी घडविण्याचे उद्दिष्ट या कोर्टच्या उभारणीमुळे पुन्हा एकदा सफल झाले आहे. या कोर्टमुळे वाईच्या क्रीडा यशात नक्कीच वाढ होणार व बॅडमिंटन खेळात दर्जेदार खेळाडू घडणार असल्याची खात्री त्यांनी याठिकाणी व्यक्त केली. 

सर्व वाईकर क्रीडाप्रेमी यांनी याचा नक्की लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या उभारणीमध्ये ज्यांनी सहकार्य केले असे राजे महाडिक, शिरीष देशपांडे, अविनाश रनसिंग, रणवीर गायकवाड, माजगावकर, मनोज कान्हेरे, निलेश फणसळकर, समीर पवार, मनोज शिंदे, गजानन जाधव, सचिन चव्हाण, मदन जाधव यांचे देखील आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास वाई जिमखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रमेश यादव, सचिव सुनील शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. मंगला अहीवले, संचालक वैभव फुले, शैलेंद्र गोखले, नितीन वाघचौडे, अमीर बागुल, प्रीती कोल्हापुरे, आनंद डूबल, तुकाराम जेधे हे उपस्थित होते. रंगता बेडेकर यांनी सूत्रसंचालन तर कार्यक्रमाची सांगता सौ. मनीषा घैसास यांनी वंदे मातरम् सादर करून केली.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !