युवा पत्रकारांच्या योगदानाचा यथोचित सन्मान
शिवशाही वृत्तसेवा सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने 'दर्पण' आवृत्ती मराठी भाषेत काढली ६ जानेवारी रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यांचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो तसेच हा दिवस पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व समाजात त्यांनी बजावलेल्या महत्व पुर्ण भुमिकेची कबुली देण्यासाठी समर्पित आहे .
द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी अर्चाय बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, ॲड .संजय जंगम, अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे, जेष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, न.पा. चे मुख्य लिपिक आबा ढोबळे, बाळासाहेब पवार, सचिन गुजर, पत्रकार अभिजीत खुरासणे, संदीप देवकुळे, प्रेषित गांधी, संदेश भिसे,द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शेलार, सचिव रियाज मुजावर, राजेश सोंडकर, मिलिंद काळे,अमोद पवार उपस्थित होते. यावेळी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच उपस्थित मान्यवरांचे व पत्रकारांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी योगेश पाटील, जेष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, ॲड. संजय जंगम, राजेंद्र पवार, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत रियाज मुजावर यांनी केले. आभार प्रदर्शन मिलिंद काळे यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा