वाई एमआयडीसीतील घटना - पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी असणाऱ्या एटीएम वर अज्ञात चोरट्यांच्या टोळीने गॅसकटरच्या साह्याने तोडफोड करून त्यातील १७ लाखांची रोकड लंपास केल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी वाईच्या गुन्हे शाखेची टिम आणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेची टिम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एक एटीएम आहे. तेथील एटीएमचा लाभ एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना होत होता . हे एटीएम सकाळी सात वाजता उघडायचे व रात्री ११ वाजता तेथील शटरला कुलपे लावुन बंद केले जात होते.
तेथील एटीएमवर चोरट्यांच्या टोळीची नजर होती दिनांक ८ जानेवारीच्या रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने चक्क गॅसकटरच्या साह्याने ते एटीएम फोडून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती वाई पोलिसांना सकाळी मिळाताच पोलिस घटनास्थळी पोहचले. या गंभीर घटनेची माहिती एकत्रीत करून जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांना कळविण्यात आली. त्यानी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर आणि सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना घटना स्थळावर पाठवले. वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम परिविक्षाधीन डिवायएसपी शाम पानेगावकर, वाईचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, वाई डिबीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांची टिम उपस्थित होती. या सर्व पोलिस यंत्रणेला अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी तपास कामासाठी मार्गदर्शन केले.
वाई पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करत आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा