सिंदखेड राजा तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलठ्यांना नव निर्वाचित आमदार मनोज देवानंद कायदे यांच्याहस्ते नुकतेच लॅपटॉप व प्रिंटर वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना वेगवान सेवा देऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या. तसेच, जमिनीचे रेकॉर्ड डिजिटल करून शेतकऱ्यांना तत्पर सेवा द्या, असे आवाहन याप्रसंगी आमदार मनोज कायदे यांनी केले. सिंदखेडराजा तहसिल कार्यालयात ९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जमिनीचे रेकॉर्ड डिजिटल करून नागरिकांना तत्पर सेवा मिळावी, यासाठी राज्य सरकारने तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर दिले आहेत. त्यानुसार, सिंदखेडराजा तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आमदार
मनोज कायदे यांच्याहस्ते तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप करण्यात आले. तसेच, पहिल्यांदा सिंदखेडराजाचे आमदार झाल्याबद्दल मनोज कायदे यांचा सत्कारही उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, निवासी नायब तहसीलदार प्रविण वराडे व तहसील प्रशासनाचे अधिकारी, तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा