१ लाख ३ हजार रुपये किंमतीची ४०० लिटर दारू व इतर सामुग्री केली नष्ट
पंढरपूर तालुक्यातील विटे गावच्या एका शेतात मोकळ्या जागेत झाडीमध्ये अवैध हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण ४०हजार रुपये किंमत असलेली ४०० लिटर हातभट्टी दारू, व १८०० लिटर गुळमिश्रित रसायन ६३हजार- असे एकूण एक लाख तीन हजार रु किमतीचा मुद्देमाल व हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केले आहे. सदर जागेच्या शेतमालकाविरुद्ध व दारू विकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई श्री अतुल कुलकर्णी सो पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उप विभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक टी वाय मुजावर, तालुका पोलीस स्टेशन, भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी पोलीस हेडकॉन्स्टेबल, विनायक क्षीरसागर पोलीस हेडकॉन्स्टेबल, अमोल गावडे पोलीस कॉन्स्टेबल, हूसेन नदाफ पोलीस कॉन्स्टेबल या पथकांनी केली. आरोपी बिभीषण शरद काळे यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस हवालदार गजानन माळी हे करत आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा